जालना (प्रतिनिधी) : अंबड कडून येणारी क्रेटा कार आणि मंठा चौफुली कडून अंबड चौफुली कडे येणारी MH14CL0548 या क्रमांकाची रुग्णवाहिका यांचा गती नियंत्रणात नसल्याने ११ ऑगस्ट २०२६ रोजी मध्यरात्री ११ च्या सुमारास अपघात झाला आहे. पोलिसांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने हलवून, रस्ते मोकळे करण्यात आलेले आहेत, जीवित हानी बद्दलची माहिती रात्री उशिरापर्यंत घेणे सुरूच होते.

रस्त्यावर डीझेल आणि ऑईल :
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित अपघातात भर चौकात रस्त्यावर डीझेल आणि ऑईल सांडलेले असून, रिमझिम पाउस देखील सुरु आहे, इतर वाहनांनी आपापली वाहने नियंत्रित आणि वेग मर्यादित ठेवून चालवावीत जेणेकरून ती अपघातग्रस्त होण्यापासून स्वतःला वाचवू शकतील.
Source: दक्षवेध न्यूज नेटवर्क : जालना (प्रतिनिधी)
