जालना (प्रतिनिधी) : जालना शहरातील एमआयडीसी परिसरातील ट्रान्सपोर्ट कंपनीच्या इमारतीत सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर चंदनझिरा पोलिसांनी धाड टाकून ९ जणांना ताब्यात घेत ६ लाख ८८ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई ४ ऑगस्ट रोजी पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
गुप्त माहितीच्या आधारे न्यू जगदंबा ट्रान्सपोर्ट, एमआयडीसी परिसरातील ठिकाणी छापा टाकण्यात आला. यावेळी आरोपी जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम, मोबाईल फोन, मोटारसायकल, एक रिक्षा तसेच इतर साहित्य असा एकूण ६,८८,६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जुगार खेळणाऱ्यांसह अड्डा उपलब्ध करून देणाऱ्या व्यक्तीविरुद्धही महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत शिवाजी चोरमारे, गोविंद शेळके, किरण जाधव, प्रदीप टेकाळे, अंकुश इंगळे, शिवा वाळकेकर, सुनील आदमाने, शे हकिम गफूर यांच्यासह ट्रान्सपोर्ट गाळ्याचे चालक संतोष शिंगारे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वीसिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किरण बिडवे, पोउपनि स्कॉट, मनसुब वेताळ, राजेंद्र ठाकूर, कृष्णा तंगे, शिवाजी जमधडे, सुभाष पवार, अभिजित वायकोस, शरद पवार, सागर खैरे, रेश्मा गुरुम व शैला लोखंडे या पोलीस पथकाने केली.
